सध्या विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आज सकाळी आंतरवली सराटी इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी अनेकांना पडण्याची देखील घोषणा केली आहे.
याबाबत ते म्हणाले, कोण्या एका जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही. आपण विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवार देणार नाही. मात्र आता फक्त पाडापाडी करणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र कोणाला पाडणार, याबाबतचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
मित्र पक्षांची यादी आली नसल्याने निवडणूक लढणार नसल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता.४) स्पष्ट केले. मित्र पक्षांची यादी आलेली नाही. एकाच जातीवर कुणी निवडणूक लढू शकत नाही, असेही ते म्हणाले. यामुळे आता कोणाला पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असले तरी ज्यांनी आपल्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, अशा आमदारांना पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक लढणार नाही, आता उमेदवार पाडणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मराठा उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आता याला पाड, त्याला पाड म्हणण्याची इच्छा नाही. असेही ते म्हणाले आहे. मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. घरा घरातला एक मराठा करोडो आहेत, निवडणूक प्रक्रियेत असलो तरी नसलो तरी खेळ खाल्लास, सुट्टी नाही, असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी एक इशारा दिला आहे. ही आमची माघार नाही तर गनिमी कावा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं काय होणार? हे लवकरच समजेल. आता लवकरच चित्र स्पष्ट होईल. 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.