उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार झाला. यामुळे याठिकाणी दगडफेक आणि हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजेच शूट साईटचे आदेशही देण्यात आले आहेत. आतापर्यंत या हिंसाचारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहे.
येथील मदरशावर कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलीस वाहनांची जाळपोळही करण्यात आली. यामुळे पोलिसांनी देखील कडक पाऊल उचलले असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 100 जण जखमी झाले आहेत.
मदरसा अतिक्रम केलेल्या जमिनीवर उभारण्यात आला होता, असंही पोलिसांनी सांगितले. कारवाईसाठी पोहोचलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. मदरशावर बुलडोझर चालवल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.
याबाबत राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) ए. पी. अनुशमन यांनी दिली आहे. याठिकाणी हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सध्या याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. याबाबत तपास सुरू असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.