Paithan News : अगं आई गं! मुलाचा आईच्या डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू; कारण वाचून हादराल

Paithan News : पैठण तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी स्कूल बसने एका पाचवर्षीय मुलाला चिरडले आहे. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पैठण तालुक्यातील चितेगाव जवळील पांगला गावात झाला आहे. घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिडकीन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आईसोबत चालत जाणार्‍या आई आणि मुलाला स्कूल बसने जोरदार धडक दिली. यामध्ये रस्त्यावरून चालत जाणार्‍या मुलाचा मृत्यू झाला. हमजा शाहरुख शेख असे मृत मुलाचे नावे आहे. आईच्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू झाल्यामुळे आईने हंबरडा फोडला आहे.

दरम्यान, बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. हा अपघात झाल्यानंतर बस चालकाने तिथून पळ काढला. घटनास्थळी बिडकीन पोलीसांनी धाव घेतली. त्यावेळी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच तेथे अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली.

हा अपघात खूपच भीषण होता. या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत बस जळून खाक झाली होती. या प्रकरणाचा बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घुले तपास करत आहेत. यावेळी घटनास्थळी गर्दी झाली होती.

तसेच हमजाच्या पाश्चात्य त्याची एक बहिण आहे. त्याचे वडील चहाची टपरी चालवून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावरून अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.