लोकसभेला पानिपत, आता विधानसभेला काय होणार? भाजपला हादरवणारा सर्व्हे आला समोर…

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला अजून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येताना दिसतेय. यामुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

आता अनेक धक्कादायक सर्व्हे समोर आले आहेत. महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत. एका लोकसभा मतदारसंघात ०६ विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजेच ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ येतात. ४८ लोकसभा मतदारसंघात महायुतीला १७, मविआला ३० तर इतरांमध्ये सांगलीत विशाल पाटील बंडखोर आमदार निवडून आले.

यावरून महाविकास आघाडीला १५४ जागांवर आघाडी आहे. तर महायुती १२३ जागांवर पुढे आहे. यामुळे आता महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या हातातून हे राज्य गेलं तर हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, विधानसभेत बहुमताचा आकडा आहे १४५. या सर्व्हे नुसार मविआ ३१ जागांनी पुढे असून विधानसभेत मविआची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फुटले, यामुळे लोकांचा भाजपवर राग आहे. यामुळे महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

यामुळे महाविकास आघाडीला १५४ जागांवर आघाडी आहे. तर महायुती १२३ जागांवर पुढे आहे. दरम्यान, विधानसभेत मविआची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे विधानसभा निवडणुक काही दिवसांवर आली असून लवकरच यामध्ये काय होणार हे समोर येईल.