Panvel news : घरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने १० महिन्यांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पनवेल येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आई दुपारी झोपली होती. मात्र तिला जाग आल्यावर धक्काच बसला आहे.
दुपारी जेव्हा आई झोपून उठली तेव्हा तिला आपला १० महिन्यांचा मुलगा प्लॅस्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला. आई दुपारच्या वेळी घरात झोपलेली असताना तो आईसोबत घरातच होता. यामुळे तो घरात खेळत असेल असे त्यांना वाटले. मात्र यावेळी मोठी दुःखद घटना घडली आहे.
असे असताना जेव्हा आईला जाग आली तेव्हा तो तिला कुठेच दिसला नाही. तिने त्याला आवाज दिला, त्याचा शोध घेतला. काही वेळाने तिला बाळ पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेले दिसले. यामुळे तिला मोठा धक्का बसला.
आशिक अल इमान असे बाळाचे नाव आहे. याबाबत आईने एका बांधकामाच्या ठिकाणी कामावर असलेल्या तिच्या पतीला याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पती तात्काळ घरी आला आणि बाळाला डॉक्टरांकडे नेले.
असे असताना मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. यामुळे या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली.
आशिक अल इमान याचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. घरची परिस्थिती हालाखीची असून या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे एकुलत एक बाळ या घटनेमुळे या जगातून निघून गेले आहे.