Parbhani News : परभणीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राहटी पुलाखाली ही घटना घडली आहे. याठिकाणी हातपाय धुण्यासाठी गेलेल्या इसमास पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात बुडून मृत्यू झाला असावा.
याबाबत माहिती पोलिसांनी दिली आहे. सचिन घन असे या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती हा १२ डिसेंबरपासून परभणी शहरातील येलदरकर कॉलनी येथून बेपत्ता होता. मात्र नंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली होती.
या इसमाचा मृतदेह आढळल्याने आता पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन घन १२ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास घराबाहेर पडले होते. पंधरा मिनिटात परत येतो, असे सांगुन तो घराबाहेर गेला. मात्र नंतर घरी आला नाही.
याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद देण्यात आली. नंतर सचिन घन यांचा मृतदेह राहटी पुलाखाली पूर्णा नदी पात्रात आढळला. सचिन घन हे राहटी पुलाखाली हातपाय धुण्यासाठी गेले असावेत.
तसेच त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात बुडून मृत्यू झाला असावा, अशी खबर पूर्णा पोलिसात देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. परभणीच्या राहटी पुलाखाली या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पुर्णा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये घातपात झाला आहे का?असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे सध्या या प्रकरणाची याठिकाणी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.