जगासाठी एलियन्स हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. आकाशात कोणतीही वेगळी गोष्ट दिसली की त्याला एलियन्सचे विमान बोलून लोक मोकळे होताना दिसतात. एलियन्सबाबत दरदिवशीच वेगवेगळे दावे केले जातात. अशातच एक विचित्र बातमी समोर आली आहे.
एका आदिवासी गटाला त्यांच्यावर एलियन्स हल्ला करतील अशी भिती वाटत आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ते लोक शक्य तितके प्रयत्न करताना दिसून येत आहे. या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या आदिवसींचे म्हणणे आहे की त्यांनी एलियन्सला बघितले आहे. ते खुप भयानक दिसतात. त्यांच्या डोळ्यांचा रंग पिवळा आहे. ते सात फुट उंचीचे आहे. संबंधित आदिवासी हे पेरुच्या अल्टो नाने जिल्ह्यात राहतात.
त्या आदिवासींनी एलियन्सला नावंही दिले आहे. लॉस पेलाकरस असे नाव आदिवासांनी त्या एलियन्सला दिले आहे. काही काळानंतर गडद रंगाची हुडी घालून ते आमच्यावर हल्ला करतील, असे त्या आदिवासी लोकांचे म्हणणे आहे.
११ जुलै रोजी पहिल्यांदा त्यांनी एलियन्स बघितले होते, असा दावा त्यांनी केला होता. त्या एलियन्सला पाहून १५ वर्षांची एक मुलगी रुग्णालयात दाखल झाली आहे. एकाने म्हटले आहे की, त्यांनी मुलीवर हल्ला केला होता. एका एलियन्सने तिच्या मानेवर वार केले होते.
एलियन्समुळे तेथील लोक खुपच घाबरलेले आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लोक खुप काळजी घेत आहे. लहान मुलं, महिला आणि वृद्धांची जास्त काळजी घेतली जात आहे. त्यांना रात्री झोपही लागत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही आदिवासींनी सांगितले की, ते एलियन्स मास्क घालतात. त्यांचे डोके मोठ्या आकाराचे आहेत. त्यांचे डोळे पिवळे आहेत. त्यांच्याकडे शुजही आहेत ज्यामुळे ते उडू शकतात. ते एक मीटर उंचीपर्यंत उडतात आम्ही त्यांना गोळ्याही घातल्या होत्या. पण त्यानंतर पुन्हा उठून गायब होऊन गेले होते.