पुण्याला विमान उडणार होतं, वैमानिकही होता सज्ज; पण गेटजवळ जाताच घडली ‘ही’ भयानक घटना

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पायलटचा विमान टेक ऑफपूर्वीच मृत्यू झाला आहे. तो इंडिगो एअरलाईन्सचा वैमानिक होता. संबंधित घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे.

मनोज सुब्रमण्यम असे त्या ४० वर्षीय वैमानिकाचे नाव होते. ते पुण्याला विमान घेऊन जाणार होते. पण टेकऑफपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

इंडिगो एअरलाईन्सचे विमान नागपूरहून पुण्याला येणार होते. दुपारी १ वाजता हे विमान टेक ऑफ होणार होते. त्यासाठी मनोज सुब्रमण्यम निघालेले असताना बोर्डिंग जवळ ते अचानक खाली पडले. त्यावेळी तेथील स्टाफने त्यांना उचलले.

तातडीने मनोज यांना किग्स किंग्ज्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार आज त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृत्युचे खरे कारण समोर येईल असे म्हटले जात आहे.

वैमानिकांचे काम हे खुप जिकरीचे असते. कारण त्यांनाच अनेक प्रवाशांना सुखरुपपणे पोहचवायचे असते. त्यामुळे त्यांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळही दिला जातो. त्यानुसार मनोज हे २७ तासांनंतर पुन्हा कामावर आले होते. पण विमान उडवण्याआधीच त्यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.

इंडिगो एअरलाईन्सने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, आज नागपूरमधल्या आमच्या एका वैमानिकाचे निधन झाल्याचं दु:ख आहे. नागपूरमध्ये विमानतळावर त्यांची प्रकृती बघिडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला आहे.