Politics : गेल्या काही दिवासांपासून राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. तसे पाहायला गेल तर राजकारण आणि कलाकर यांचे खूप जवळचे संबंध आहे. आता प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. किरण माने आज शिवबंधन हाती बांधणार आहेत.
प्रसिद्ध मराठी अभिनेता किरण माने हे ७ जानेवारीला राजकारणात पदार्पण करणार आहेत. ते आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधतील.
किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. किरण माने यांनी गेल्या काही महिन्यांपासून राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा इरादा व्यक्त केला होता. ते शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांची ही शक्यता खरी झाली.
किरण माने यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला मोठा बळ मिळाले आहे. त्यांची अभिनय आणि राजकीय अनुभव यामुळे शिवसेनेला फायदा होऊ शकतो. किरण माने हे नेहमीच आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी किरण माने यांना एका टीव्ही मालिकातून काढून टाकण्यात आले होते. यामागे भाजपचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता.किरण माने यांच्या राजकारणात प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नेटकरीही लक्ष ठेवून आहेत. किरण माने यांचे राजकारणातील भविष्य कसे असेल हे पाहणे औत्सुक्यास्पद ठरेल.
किरण माने यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, किरण माने हे मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी मुलगी झाली हो, बिग बॉस मराठी आणि अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. माने हे राजकारणात नवखे आहेत. परंतु, त्यांच्याकडे अभिनयाचा आणि राजकारणाचा अनुभव असल्याने ते राजकारणातही यशस्वी होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे.