Prathamesh Parab : अखेर दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजु! पहा कोण आहे ती सुंदरी…

Prathamesh Parab : मराठी अभिनेता प्रथमेश परब सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रथमेश परबने बोहल्यावर चढायचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने चक्क नवरोबाच्या लूकमधला फोटो शेअर करत लग्नाचं निमंत्रणच पाठवलं. प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोवर लिहिलं आहे की, ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय.

अशी पोस्ट केल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, सगळेच विचारतायेत. विचार केला सांगूनच टाकू. गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा! #Surprise असा हॅशटॅगही अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताना लिहिला आहे.

यामुळे आता तो खरंच लग्न करतोय की त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे सगळं सुरू आहे हे लवकरच समोर येईल. यावर काहींनी काहींनी ही ‘टाइमपास ४’ साठीची पोस्ट आहे असं म्हटलं आहे. यामुळे आता सर्वांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच काहींनी तो ‘डार्लिंग २’ चे प्रमोशन करतो आहे असे म्हटले आहे. याशिवाय काहींना असे वाटतेय की त्याच्या नव्या सिनेमाचेच नाव ‘लग्नपत्रिका’ आहे. यामुळे त्याने अशी पोस्ट केली आहे, असेही अनेकांना वाटत आहे. यामुळे गुरुवारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

या पोस्टवर त्याचे काही चाहते त्याने खरोखर लग्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. ‘तुझ्या हळदीत नाचायला येऊ’ अशा आशयाच्या कमेंट्सही केल्या आहेत. यामुळे अनेकांनी त्याला लग्न करण्याचा देखील सल्ला दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या वर्षात प्रथमेशचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘टाइमपास ३’ आणि ‘टकाटक २’ या सिनेमांची नावं घेता येतील. प्रथमेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो डिझ्नी प्लस हॉटस्टार या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ‘ताझा खबर’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.