Prathamesh Laghate: …बाकी सगळ्या मारक्या म्हशी”, प्रथमेश लघाटेचा बायकोसाठी चमत्कारीक उखाणा, सगळेच झाले लोटपोट अन्…

Prathamesh Laghate: सिनेसृष्टीत सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, सुरुची अडारकर-पियुष रानडे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या कलाकार जोड्यांसह गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे विवाह बंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

नुकतेच गायिका मुग्धा वैशंपायन आणि अभिनेता प्रथमेश लघाटे यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे लग्न २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूण येथे पार पडले. लग्नानंतर मुग्धा आणि प्रथमेश आता सासरी राहू लागले आहेत. यावेळी प्रथमेशने घेतलेल्या मजेशीर उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रथमेश आणि मुग्धा यांच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रथमेश आणि मुग्धा फुलांनी सजवलेल्या पायघड्यांवरून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी खास उखाणे घेतले. प्रथमेशने घेतलेला उखाणा ऐकून सर्वजण पोट धरून हसत आहेत.

“कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असा उखाणा त्याने घेतला आहे. या उखाण्यात प्रथमेशने मुग्धाला स्वतःची गरीब गाय म्हणून संबोधले आहे. या मजेशीर उखाण्याने सर्व उपस्थितांनी जोरदारपणे हसले.

तर मुग्धानेही “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” असा उखाणा घेतला.

प्रथमेश आणि मुग्धा हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांचे लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठीही खास होते. लग्नानंतर आता ते दोघेही एकत्र सुखाने राहत आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे.