---Advertisement---

प्रवीण तरडेंच्या पत्नीच्या पोस्टची सर्वत्र चर्चा, हिंदू म्हणताना खंत वाटायची पण…,पोस्टमध्ये नेमकं काय?

---Advertisement---

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे हे वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्यांची पत्नी स्नेहल तरडे देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री या कायमच त्यांच्या विविध गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतात. आता स्नेहल तरडे यांच्या एका पोस्टमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

असे असताना स्नेहल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. शिक्षणाला वय नसते, असे म्हणतात ते योग्यच आहे, हे सिद्ध करत स्नेहलने थेट वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पत्नीने वेदांचा अभ्यास पूर्ण केला असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरुन दिली.

दरम्यान, हिंदु धर्मात वेद, शास्त्र, यांना विशेष महत्त्व आहे. त्याच वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. याविषयी सोनलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

याबाबत स्नेहलने म्हटले की, वेदांचा अभ्यास स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. याबाबत एक इच्छा राहून गेली. भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली.

तसेच भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या पोस्टवर अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, स्नेहलही अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच सोशल मीडियाच्या पोस्टमुळे देखील त्यांनी ओळख निर्माण झाली आहे. आता तिच्या या अभ्यासामुळेही ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---