वनडे क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा राडा, फक्त ३९ चेंडूंमध्ये ठोकल्या १७८ धावा; सगळेच झाले शॉक

भारतीय संघातील स्पर्धा आता वाढताना दिसून येत आहे. चांगली कामगिरी केली नाही, तर त्याच्याजागी लगेचच दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जात आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना संघातून बाहेर व्हावं लागत आहे. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ.

पृथ्वी शॉला भारतीय संघात चांगली कामगिरी करता न आल्यामुळे त्याला संघात स्थान मिळत नाहीये. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. या क्रिकेटमध्ये तो दमदार कामगिरी करताना दिसून येत आहे.

नॉर्थम्पटनशायर संघाकडून तो खेळत आहे. अशात सोमरसेटविरुद्धच्या सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने आता द्विशतक ठोकले आहे. फक्त १५३ चेंडूत त्याने २४४ धावांची खेळी केली आहे.

पृथ्वी शॉने फक्त १२९ चेंडूमध्ये द्विशतक ठोकले आहे. आपण अजूनही क्रिकेटचा स्टार असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. २४४ धावांच्या जोरावर त्याच्या संघाने ५० ओव्हरमध्ये ४१५ धावा केल्या आहे. त्याच्या या द्विशतकाची सगळीकडेच चर्चा होत आहे.

पृथ्वी शॉने या खेळीत २८ चौकार आणि ११ षटकार मारले आहे. म्हणजेच त्याने फक्त ३९ चेंडूतच १७८ धावा ठोकल्या आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्यासोबत नॉर्थम्पटनशायरकडून व्हाईटमॅनने ५४ आणि रिकार्डोने ४७ धावा केल्या होत्या.

दरम्यान, गेल्याकाही महिन्यांपासून तो खुप खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला भारतीय संघात काही सामने खेळण्याची संधी मिळाली होती. पण तरी त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तसेच आयपीएलमध्ये त्याला मोठी खेळी खेळता आली नव्हती. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते.

काही आठवड्यांपूर्वी पृथ्वी शॉने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तो म्हणाला होता की, प्रत्येकजण एकमेकांशी बोलतं पण मन कोणी मोकळं करत नाही. मी माझं मन माझ्या वडिलांसमोर मोकळं करतो. तसेच माझे कोच प्रशांत शेट्टी यांच्याशीही मी चर्चा करत असतो. मी बाकीच्यांशी जास्त बोलत नाही.