Pune Crime : पुणे शहरातून एक बातमी समोर आली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी मटणाची उधारी तब्बल ६१ लाख रुपये झाल्याने हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कर पोलिसांनी शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा याचा पुरवठा केला जात होता. विक्रेत्याने या हॉटेलला गेल्या चार वर्षात 2 कोटी ९१ लाख ८१ हजार रुपयांचे मटण दिले.
असे असताना हॉटेलचालकाने एकूण उधारीपैकी दोन कोटी ३० लाख १९ हजार रुपये परत केले. मात्र नंतर पैसे देण्यास नकार दिला. उर्वरित रक्कम ६१ लाख ६२ हजार रुपये देण्यास हॉटेलचालक टाळाटाळ करत होता. यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला.
त्यामुळे मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हॉटेल चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी हॉटेलचालक अफझल युसूफ बागवान आणि अहतेशाम अयाज बागवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सध्या पोलीस तपास सुरू असून या घटनेची माहिती पोलीस घेत आहेत. घटनेवरून याचा तपास सुरू आहे.
पुणे शहरातील हा एक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्याने हे पैसे का दिले नाहीत, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. यामुळे आता हे पैसे मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे मात्र शहरात याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.