Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून ते व्हायरल करेल, अस म्हणत पतीच्या दोन मित्रांनीच महिलेवर बलात्कार केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सातारा येथे राहते. तिचा पती पुण्यात नोकरी करतो. पीडित महिलेचा पती पंढरपूरला जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या ओळखीच्या बाळासाहेब पवार यांना तिला पंढरपूरला सोडण्यास सांगितले. बाळासाहेब पवार यांनी त्याला होकार दिला.
बाळासाहेब पवार यांनी फिर्यादी महिलेला कारमध्ये घेऊन पुण्याला आणले. ती अंघोळ करत असताना तिचे त्याने व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तो नराधम तेव्हड्यावरच न थांबता त्याने त्याचा मित्र सुशांत पवारला बोलवून घेतले. सुशांतने देखील महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिला घरी परतली.
पीडित महिलाने आपल्या पतीशी याबाबत बोलून सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (८ जानेवारी) 35 वर्षीय पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन बाळासाहेब आप्पासाहेब पवार (वय-40 रा. कराड, सातारा), सुशांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.