Pune news : मोठी बातमी! पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; दगडाने ठेचले, अन्…

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कोंढवा येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर हुसेन शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वजीर हुसेन शेख हे काही दिवसांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झाले होते. ते कोंढवा परिसरात राहायला होते. यावेळी ही घटना घडली आहे.

रात्री साधारण ८ वाजयच्या सुमारास हुसेन यांना अज्ञात व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या वानवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत नेमका हल्ला कुणी केला याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी जुन्या घटनेतून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेनं पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत अजूनही कोणती माहिती समोर आली नाही.

गुन्ह्याचा पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पूर्वीचा काही राग असेल का याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी याबाबत अनेकांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे लवकरच आरोपी अटकेत येईल, असे पोलीस म्हणाले.