Pune News : सराफी पेढीत दृश्यम स्टाईल चोरी; मित्राला दारु पाजून पळवल्या चाव्या, नंतर घडलं भयंकर

Pune News : पुण्यात एक मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील रविवार पेठेतील सराफी पेढीचे कुलूप उघडून तिजोरीतील तीन कोटी ३२ लाख रुपये किमतीचे पाच किलो सोने आणि दहा लाख ९३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

याबाबत माहिती अशी की, या सराफी पेढीच्या व्यवस्थापकाच्या मित्राने त्याला थर्टी फर्स्टच्या रात्री मोठ्या प्रमाणावर दारू पाजली. यामुळे त्याला काय समजलं नाही. नंतर पेढीच्या चाव्या चोरून मध्यरात्री चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे आता व्यवसायिक घाबरले आहेत.

या सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ घडली आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, तक्रारदार घटनेच्या दिवशी कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते. त्यामुळे व्यवस्थापकाने नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर तो त्याच्या राहत्या घरी गेला. यानंतर ही घटना घडली आहे.

तसेच व्यवस्थापक झोपताच त्याच्या रूम पार्टनरने सराफी पेढीच्या चाव्या काढून घेतल्या. त्याने सराफी पेढी गाठून रात्रीच सराफी पेढी उघडून तिजोरीतील तीन कोटी ३२ लाख रुपयांचे सोने आणि १० लाख ९३ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. नंतर चाव्या देखील तेथेच ठेवल्या.

या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. पुण्यातील वर्दळीच्या भातात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे माहिती घेऊन तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.