Pune news : पुण्यात भीषण अपघात, भरधाव टेम्पोने 6 वाहनांना उडवले, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल…

Pune news : पुण्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. येथील पिरंगुडा घाटात भीषण अपघात घडला आहे. याठिकाणी टेम्पोने पाच दुचाकींनी धडक दिली आहे. या अपघाताने एकच पळापळ उडाली होती. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची भीषणता तीव्र होती. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

दरम्यान, अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एका डॉक्टरांचाही समावेश आहे. हा अपघात टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

याबाबत गोविंद लाल या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान,पिरंगुडा घाटात हा भीषण अपघात झाल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती.

भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने पाच दुचाकींनी धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले असून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे याठिकाणी गर्दी झाली. नंतर याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन जखमींना लगेच रुग्णालयात दाखल केले. यावेळी जखमींचे नातेवाईक देखील उपस्थित होते.