Pune news : हसत्या खेळत्या चिमुकल्याचा करुण अंत, शाळेतून घरी निघाला, वाटेत सळई डोक्यात पडली, अन्…; पुण्यातील घटना

Pune news : पुणे येथील बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.

रुद्र केतन राऊत असे या मुलाचे नाव आहे. याठिकाणी केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. या बिल्डिंगचे काम सुरू असताना या बिल्डिंग वरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. या ठिकाणी असलेल्या रुद्र केतन राऊत याच्या डोक्यात सगळी पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचे निधन झाले. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये या संदर्भात बिल्डर आणि साईड इंजिनिअरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असताना बिल्डरक़डून खबरदारी घेतली जात नाही. पुण्यात अनेक कामारागांचा खबरदारी न घेतल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे बिल्डरचा हलगर्जीपणा वारंवार समोर आला आहे. यामुळे यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

असे असताना आता लहानग्याचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावर काठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.