Rahul Dravid : भारताने वर्ल्डकप गमावल्यानंतर कोच राहुल द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया आली समोर, केलं मोठं वक्तव्य…

Rahul Dravid : रविवारी अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र टीमने फायलन सोडली तर सगळे सामने जिंकले. यामुळे टीमची कामगिरी चांगली राहिली.

सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आम्ही खरोखर चांगली मोहीम केली. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा सरस होता, त्यांचे अभिनंदन. द्रविड म्हणाला- आम्ही ३०-४० धावा कमी पडलो.

त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. दुपारी चेंडू थांबत होता, जास्त दव नव्हते, परंतु प्रकाशात ते चांगले होते. आम्हाला चौकार मारता आले नाहीत आणि महत्त्वाच्या अंतराने आम्ही विकेट गमावत राहिलो. यामुळे असा निकाल लागला.

स्कोअर २८०-२९० पर्यंत पोहोचला असता तर सामना वेगळा झाला असता. ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी केली. मुलं निराश आहेत. ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण भावूक होतो. त्याला प्रशिक्षक म्हणून पाहणे अवघड होते, असेही तो म्हणाला.

दरम्यान, सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. ते पुन्हा प्रशिक्षक पद कायम ठेवणार की टीम इंडियाला नवा कोच मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. यामुळे हा कप जिंकणे सर्वांचे लक्ष होते.

याबाबत द्रविड यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा द्रविड त्यांच्या भविष्याबाबत म्हणाले, मी याचा विचार केलेला नाही. मला याचा विचार करायला वेळ नाही. यामुळे त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.