लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती.
या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती अशी की, एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात आलेली तेजी आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यात झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यामुळे याबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जेपीसीची मागणी केली आहे. याला आता शरद पवार यांच्या पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. चुकीच्या एक्झिट पोलमुळे जर भांडवली बाजारात इतकी अनियमितता होऊ शकते तर त्याची चौकशी होण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच भारतातील जनतेला यामागचे सत्य जाण्याचा हक्क आहे, एक्झिट पोल इतके कसे काय चुकले आणि माध्यमांच्या यातील भूमिकेची पारदर्शकपणे चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले, यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सर्वात मोठा घोषणा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एक्झिट पोल त्यानंतर शेअर बाजारात आलेली तेजी आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यात झालेल्या पडझडीत सामान्य गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे हा एक मोठा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी याविषयी जेपीसीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षानेही पाठिंबा दिला आहे. यामुळे या चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.