ठाकरेंच्या पाच खासदारांवर कारवाई होणार, खासदारकी जाणार? धक्कादायक माहिती आली समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. गेल्या वर्षभरापासून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद पाहायला मिळत आहे. ते एकमेकांवर आरोपही करताना दिसून येत आहे. अशात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी ठाकरे गटातील पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पाचही खासदारांनी व्हीप पाळला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे राहूल शेवाळे यांनी म्हटले आहे.

राहूल शेवाळे यांच्या वक्तव्याने ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशात आमदार संजय शिरसाट यांनीही एक खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबातील एक वक्ती जेलमध्ये जाणार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने माझा जबाब नोंदवून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला आहे.

पुरावे नसेल तर तुम्ही काहीही केलं तरी कोर्ट तुम्हाला सोडतं. पण पुरावे असतील तर तुम्हाला माफी मिळत नाही. त्यांना मदत करणारे जे कोण असेल ते तुरुंगात जातील. याचिका दाखल केल्यामुळे काहीच होत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

तसेच कोण तुरुंगात जाणार असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता? त्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊस असेल, अनिल परब असेल तसेच ठाकरे कुटुंबातील जी व्यक्ती असेल ती तुरुंगात जाणार, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.