Raj thackeray : टोल नाका आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंना अटक होणार? बड्या नेत्याने उचलले मोठे पाऊल

Raj thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. टोल बंद करा अन्यथा आम्ही ते जाळून टाकू अशी थेट मागणी त्यांनी केल्याने वातावरण तापले आहे. असे असताना या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे. यामुळे आता राज ठाकरे यांना खरच अटक होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

दरम्यान, ते म्हणाले, महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत की, काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले. यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा दिला होता. यामुळे अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर गोंधळ घातला होता.

अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर आंदोलन केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोल फ्री असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलंही. काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली. यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.