Rajeev Samant: लाखोंची नोकरी सोडली अन् आईच्या नावावरून बनवली सर्वात मोठी वायनरी, वाचा सुला वाईनचा इतिहास…

Rajeev Samant: वाईनची डिमांड भारतातच नव्हे तर विदेशात देखील खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. अनेकजण याचे शौकीन आहेत. भारतात वाईनपेक्षा व्हिस्की, वोडका सारखे हार्ड मद्य जादा पसंत केले जातात. याचा मोठ्या प्रमाणावर खप भारतात होतो.

सामान्य भारतीयांची चव वाइनपेक्षा हार्ड मद्यासाठी अधिक योग्य आहे. परंतु वाईनचे चाहते असले तरीही त्यांची संख्या मर्यादित आहे. सुला मर्यादित स्वदेशी ब्रँडपैकी एक आहे, ज्याने सामान्य भारतीयांना वाईन उपलब्ध करून दिली.

याबाबत माहिती अशी की, नाशिकमध्ये १९५० मध्ये हजारो एकरांवर पसरलेला सुला वाईनचा प्रोजेक्ट आहे. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या राजीव यांनी आपल्या आईच्या नावावरून सुला वाइनची सुरुवात केली. आज हा व्यवसाय जगभरात पसरला आहे.

राजीव यांनी इंजीनयिरिंगमध्ये मास्टरची पदवी घेतली. त्यांना याठिकाणी नोकरी देखील मिळाली होती. असे असताना धावळीच्या जिवनाचा त्यांना कंटाळा आला आणि म्हणूनच त्यांनी मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्याकडे नाशिक जवळ २० एकर जमीन होती. याठिकाणी त्यांनी आंब्याच्या बागेपासून ते गुलाब ते द्राक्षांची शेती केली. ते कॅलिफॉर्नियाला परतले तेव्हा त्यांनी प्रसिद्ध वाईनमेकर कॅरी डॅमस्कीसोबत यांची भेट घेतली.

डॅमस्की यांनी राजीवचे ऐकलं आणि सुला वाईन सुरू करायला मदत केली. यामुळे आज हा मोठा ब्रँड तयार झाला. त्यांनी या ब्रँडचे नाव आपली आई सुलभा यांच्या नावावरुन सुला ठेवले. जो आज कित्येक देशात पसरला आहे. सुला वाईनने नाशिकला एक वेगळी ओळख दिली.

दरम्यान, पुढे यामुळे नाशिकमध्ये पर्यटनाला जाणाऱ्या लोकांमध्येही सुला वाईन टेस्ट करणे एक आकर्षण बनले आहे. २०० एकरात सुरू झालेली वायनरी काहिच दिवसांत १,८०० एकरपर्यंत परतली. सुला वाईनमध्ये दररोज ८ ते ९ हजार टन द्राक्षांद्वारे वाईन तयार केली जाते.

सुला क्वचत स्वदेशी ब्रँडपैकी एक आहे, ज्याने सर्वसामान्य भारतीय लोकांना वाईन उपलब्ध करून दिली, यामुळे आज अनेकजण ती खरेदी करू शकतात. आज जगातल्या अनेक देशांमध्ये ही वाईन पाठवली जाते. याला मोठी मागणी आहे.