सध्या राज्यात लोकसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याठिकाणी सध्या महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. यामध्ये महत्वाची चर्चा करण्यात आली.
यावेळी उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा झाली. या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील सरूडकर यांचे नाव पुढे आले आहे. यामुळे आता यावर अंतिम चर्चा होणार आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या पुढील अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या सोबत निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र शेट्टी यांनी नकार दिला.
यावेळी राजू शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. महाविकास आघाडीने मला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. यामुळे आता तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा झाली नाही.
कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता भाजपकडून याठिकाणी कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे याठिकाणी रंगत वाढली आहे.