काही दिवसांपूर्वी पुणे कल्याणीनगरमध्ये भीषण अपघात झाला. हे अपघात प्रकरण आता चर्चेत आहे. असे असताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण रॅप साँग गात असलेला दिसत असून त्यामध्ये तो रॅपमधून लोकांना शिव्या देत आहे.
या व्हिडिओमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रॅप साँगमध्ये, हो मी बिल्डरचा पोरगा आहे म्हणून बेलवर सुटलोय, तसेच खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत आहे. असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे लोकांचा संताप अजूनच वाढत चालला आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओमधील तरूण परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. व्हिडीओमध्ये लोकांना शिवीगाळही केली जात आहे. ही व्हिडिओ व्हायरल होत असताना हे रॅप साँग मुलाचं नसल्याचा दावा बिल्डरच्या मुलाचा वकील आणि कुटुंबियांनी केला आहे.
यामुळे याबाबत सत्यता बाहेर आली नाही. दरम्यान, पुण्यातील अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहताना तो अपघातातील आरोपी बिल्डरचा मुलगा आहे की काय? असं वाटतं. पण हा व्हिडीओ त्याचा नाही.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. चुकीचे व्हिडीओ व्हायरल करून बदनामी, असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ तांत्रिक गोष्टींचा वापर करुन बनवण्यात आल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याबाबत सत्यात बाहेर आली नाही.
पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी पैसे खाल्ले म्हणून अगरवार कुटुंबाची एवढी डेरिंग होतीय. पुण्यात पत्रकाराला मारहाण होतीय हे दुर्दैव आहे. आयुक्तांनी कारवाई करावी, नाहीतर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.