Ratnagiri News: आधी नंबर घेतला, नंतर भेटण्यासाठी आला, तरुणाचे दहावीतील मुलीसोबत भयंकर कृत्य, उडाली खळबळ…

Ratnagiri News: रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील चिपळूण तालुक्यात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत.

याबाबत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू असून चौकशी सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर आरवली परिसरात राहणाऱ्या तरुणाने मिळवला. त्याने नंतर तिला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे तो तिच्या प्रेमात असल्याचे सांगू लागला.

ती मुलगी त्याचा फोन टाळत असे. मात्र तरीही सतत फोन करीत होता. अखेर त्याचा फोन तिने स्वीकारला. तो सातत्याने तिला तुझ्यावर प्रेम आहे सांगू लागला. मात्र ती मुलगी त्याला टाळत होती. मात्र हा तरुण तिला फोन करतच राहिला.

नंतर तो तरुण मुंबईतून गावी आला. मुंबईहून तो चिपळूण सावर्डे परिसरात दाखल झाला. त्याने त्या मुलीला कॉल केला. ‘मला फक्त तुला एकदा भेटायचे आहे, मी मुंबईहून तुझ्याजवळ बोलायचे म्हणून आलो आहे. अशी विनवणी तो करू लागला.

मला फक्त एकदाच भेटू दे, असे वारंवार म्हणू लागला. नंतर तिच्या घराबाहेर जाऊन तिला बाहेर बोलावले व जबरदस्ती करून गाडीवर बसवले. यानंतर मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी अल्पवयीन असल्याने ती जागीच बेशुद्ध पडली.

शुद्ध आल्यावर ती घरी गेली व तिने घरच्यांना हा प्रसंग सांगितला. यामुळे घरच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास करून एकाला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.