गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अहमदाबातमध्ये हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एका ३० वर्षीय व्यक्तीने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याला भयंकर मृत्यू दिला आहे. यामुळे या प्रकरणाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्याने आपल्या कारखाली चिरडत त्याने एकाची हत्या केली आहे. ३० वर्षीय तरुणाने २२ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या झालेल्या हत्येचा बदला घेत, वडिलांच्या मारेकऱ्याला ठार मारले आहे. यासाठी त्याने 22 वर्षे वाट पाहत अखेर बदला घेतला आहे.
दरम्यान, त्याच्या वडिलांना ज्याप्रकारे मारले, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या वडिलांच्या मारेकऱ्यालाही ठार केले, यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. हा आरोपी जेव्हा वडिलांची हत्या झाली तेव्हा आठ वर्षाचा होता. जसे वडिलांना मारलं तसच त्याने मारून बदला घेतला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास करत आहेत.
दरम्यान, या आरोपीने लहानपणापासूनच त्याने वडिलांच्या हत्येच्या घटनेनंतर मनात बदला घेण्याचे ठरवले होते. नखटसिंग भाटी त्याच्या सायकलवरुन जात होता. त्याचवेळी एका पिकअप ट्रकने त्याला उडवले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा एक अपघात असल्याचे सुरुवातीला दिसून आले, मात्र नंतर असं समजलं की त्याला मारण्यात आले होते.
आरोपी गोपाळसिंह भाटी याने नखटसिंगला पिकअपखाली मुद्दाम चिरडले. त्यानंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला काही अंतरावरच पकडले. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता. पण पोलीस तपासात हा हत्येचा कट असल्याचे समोर आले.
दरम्यान, या हत्येसाठी गोपाळने गेल्या आठवड्यातच आठ लाख रुपयांना पिकअप ट्रक खरेदी केला होता. त्याने यासाठी १ लाख रुपये डाऊन पेमेंट केले. त्यानंतर उर्वरित पैसे बँकेतून कर्ज घेतलं. नंतर त्याने अंदाज घेत बदला घेतला, अशी माहिती आता समोर आली आहे.