आपल्याच टीमध्ये एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी…

आयपीएलमध्ये नुकताच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना झाला. यामध्ये चेन्नईने मुंबईचा 20 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओ मध्ये रोहित शर्मा हताश होऊन ड्रेसिंग रूममध्ये जात होता. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एकटाच निराशेने ड्रेसिंग रुमकडे जाताना दिसत होता. तो नाराज होता.

मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवतायत. मात्र दुसरीकडे रोहित शर्मा अत्यंत निराश होऊन मान खाली घालून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. यामुळे किती किती नाराज असेल याचा अंदाज प्रत्येकाला आला. जीव तोडून खेळल्यानंतरही टीमच्या हाती पराभवच लागला.

यामुळे रोहित शर्मा नाराज दिसून आला. रोहित विरूद्ध टीमच्या खेळाडूंशी हात मिळवताना दिसला नाही. तो ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना तो एकटा जाताना दिसला. हार्दिक पंड्याशी असलेला कथित वाद आणि टीमचा पराभव यामुळे रोहित शर्मा एकटा पडल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एमआयच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशाही प्रत्येक सामन्यासह मावळताना दिसतेय. यामुळे हार्दिक पांड्यावर देखील टीका केली जात आहे. आता येणाऱ्या काळात काय चमत्कार होणार का हे लवकरच समजेल.

दरम्यान, या सामन्यात चेन्नईने मुंबईला 20 रन्सने पराभूत केले. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 166 च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत 105 धावांची नाबाद खेळी खेळली. रोहित शर्माच्या या खेळीमध्ये एकूण 11 चौकार आणि 5 षटकार सामील होते. मात्र तो विजयापासून लांब होता.