गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. या गोष्टींचा त्रास रोहित शर्माला होत असून त्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्मा कर्णधारपद काढून घेतल्यावर निराशही झाला नाही आणि त्याने याबाबत एक शब्दही काढला नाही. आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असल्याचे समोर येत आहे. पण तो इंडिन्सचा संघ सोडणार कधी, हेदेखील आता समोर आले आहे. हार्दिक आणि रोहित यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात आहे.
रोहित शर्माला वाद-विवाद, भांडणं या गोष्टी जास्त आवडत नाहीत. त्यामुळे हार्दिक जरी काहीही करत असला तरी आपल्याला त्यामध्ये पडायचे नाही, त्यापेक्षा आपणच संघातून बाहेर पडलेले बरे, असा विचार त्याने केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या संघात बरीच धुसफूस सुरु आहे. ही गोष्ट रोहित शर्माला पटलेली नाही.
रोहित हा मनाविरुद्ध जास्त काळ काही करू शकत नाही. त्याला मुद्दामून त्रास दिला जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच रोहित हा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार आहे. यावर्षी तर रोहितला मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही, याला काही कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
असे असले तरी पुढच्या वर्षी रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघात नसेल, हे आता स्पष्ट होत आहे. यामुळे तो पुढील वर्षी आपला शेवटचा सिझन खेळेल असेही सांगितले जात आहे. यामुळे पुढील वर्षी नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सिझनमध्ये मुंबईचा खेळ चांगला राहिला नाही. पहिल्या फेरीतच टीम बाहेर पडली. यामुळे हार्दिक पांड्यावर टीका केली जात आहे. तो यावेळी कर्णधार होता. यामुळे सुरुवातीपासूनच टीममध्ये वाद असल्याचे दिसून आले आहे.