Rohit Sharma : गिलसोबतच्या RUN-OUT वादावर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन; म्हणला, ‘खरं सांगायचं तर…’

Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला. या गोंधळामुळे रोहितला विकेट गमवावी लागली. यावर रोहित शर्माने सामना संपल्यानंतर भाष्य केले.

शिवम दुबेने फलंदाजीत उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर टिळक वर्मा आणि रिंकू सिंग यांनीही चांगले योगदान दिले. मात्र, टीम इंडियाच्या डावात सर्व काही ठीक नव्हते. भारताची सलामी जोडी शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात लाईव्ह मॅचमध्ये वाद झाला.

14 महिन्यांनंतर टी-20 संघात पुनरागमन करणारा कर्णधार रोहित भारतीय डावातील पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडताच धावबाद झाल्यानंतर शुभमनवर संतापला. टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकत सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “मैदानावर खूप थंडी होती. जेव्हा बॉल तुमच्या बोटाच्या टोकावर लागतो तेव्हा वेदना होतात. मला बॉल माझ्या बोटांना लागला तेव्हा वेदना झाल्या नाहीत. पण, त्याच वेळी मला वाटले की गिल रनसाठी जाऊ नये. मी त्याला थांबायला सांगितले. पण, त्याने मला ऐकले नाही आणि रन घेतले. या गोंधळात मी रन आऊट झालो.”

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “अशा गोष्टी होत असतात. रन आऊट झाल्यावर निराश होता येते. पण, माझ्या टीमने चांगली कामगिरी केली. दुबे आणि जितेश शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि रिंकू देखील उत्तम फॉर्ममध्ये आहेत.”

या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 17.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून विजय मिळवला.