काही दिवसांपासून टोलवरुन चांगलेच राजकारण तापलेले आहे. टोल बंद करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अनेकजण यावर आपलं मत मांडताना दिसून येत आहे. अशात एका मराठी अभिनेत्रीने टोल नाक्याबाबत तक्रार केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिला टोल नाक्यावर थांबवण्यात आले होते. त्यावेळी तिच्याकडून दुप्पट टोल घेण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. तिने व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
३१ जुलैला ऋतुजा आपल्या कुटुंबासोबत पुण्याला निघाली होती. ती लोणावळा मार्गाने पुण्याला येत होती. पण नेटवर्क नसल्यामुळे तिला टोलचे मेसेज पडले नाहीत. अशात तिने जेव्हा घरी येऊन टोलचे मेसेज बघितले तेव्हा तिला धक्काच बसला कारण तिच्याकडून अधिकचे पैसे घेण्यात आले होते.
मुंबई-पुणे प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ २४० रुपये आणि तळेगाव टोलनाक्याजवळ ८० रुपये टोल घेतला जातो. पण ऋतुराजाने मेसेज चेक केला तर खालापूरला तिच्याकडून २४० रुपये टोल घेण्यात आला तर तळेगावच्या टोलवर तिच्या अकाऊंटमधून ८० ऐवजी २४० रुपये कट झाले. असे एकून तिला ४८० रुपये तिला भरावे लागले.
जास्तीचा टोल भरावा लागल्यामुळे ऋतुजाने तक्रार केली होती. पण अजून कोणीही याबाबत उत्तर दिलेले नाही. त्यानंतर मुंबईला जाताना तिने त्याठिकाणी गाडी थांबवली आणि मॅनेजरला याबाबत विचारपूस केली.
मॅनेजर यावर म्हणाला की, मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरला म्हणून असा टोल कापला गेला आहे. मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असा टोल आहे. त्यामुळे तिने व्हिडिओ शेअर करत आता तक्रार केली आहे.
तुम्हाला काय वाटतं??? अश्या अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया !! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का? असे ऋतुजाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.