Subrata Roy : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. सुब्रत रॉय यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आश्चर्याची बाब म्हणजे अखेरच्या क्षणी त्यांना कुटुंबीयांची साथही मिळू शकली नाही. सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांनी त्यांच्या मागे पत्नी स्वप्ना राय आणि दोन मुले सुशांतो आणि सीमांतो यांना सोडले आहे. जे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्यास आहेत.
अशा परिस्थितीत जेव्हा सुब्रत रॉय आजारपणामुळे मुंबईत स्थलांतरित झाले तेव्हाही त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत राहिले नाही. त्याच वेळी, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्यासोबत नव्हते.
सुब्रत रॉय यांची प्रकृती खालावल्याने रविवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे मंगळवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आज सुब्रत रॉय यांचे पार्थिव लखनऊच्या सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
कधी काळी, आपल्या दोन मुलांच्या लग्नासाठी राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गजांना लखनौमध्ये आमंत्रित करणाऱ्या सुब्रत रॉय यांच्या अंत्यसंस्कारासाठी, त्यांची मुलं उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचा नातू हिमांक रॉय आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे.
पण, ज्या मुलांकडे वृद्धापकाळाचा सहारा म्हणून पाहीले जाते, अशी दोन्ही मुले मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नसतील. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि सपा नेते शिवपाल यादव यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
शोक व्यक्त करताना अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘सहारा श्री सुब्रत रॉय जी यांचे निधन उत्तर प्रदेश आणि देशाचे भावनिक नुकसान आहे.’ तर शिवपाल यादव यांनी सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे.