ताज्या बातम्या

सैफअली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी, पोलिसांनी सांगीतली आरोपीची धक्कादायक माहिती

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपीशी संबंधित महत्वाचे खुलासे केले आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद शरीफूल इस्लाम शेहजाद असून, तो 30 वर्षांचा आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी शिरला होता, मात्र सैफ अली खान आणि त्याच्यात झालेल्या झटापटीत हा हल्ला झाला. या घटनेनंतर आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे, आणि पोलिस त्याच्यासाठी कोठडीची मागणी करतील. त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर, आरोपी मूळचा बांगलादेशचा असल्याचा संशय आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही वैध पुरावा नाही. तसेच, त्याच्याकडे आढळलेल्या साहित्यामुळे त्याच्या बांगलादेशी असल्याची शक्यता अधिक वाटत आहे.

पोलिसांनी सांगितले की, गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता, आणि पहिल्यांदाच सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीने भारतात आल्यावर विजय दास या खोट्या नावाने आपली ओळख लपवली होती. काही काळ तो मुंबईच्या आसपासच्या भागात राहात होता. 15 दिवसांपूर्वी तो पुन्हा मुंबईत आला होता आणि हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये काम करीत होता. पोलिसांनी आरोपीला ठाण्यात अटक केली असून, त्याच्यावर याआधी कोणताही गुन्हा नोंदवला गेलेला नाही.

Related Articles

Back to top button