इडीकडून समीर वानखेडेंना जोरदार झटका! शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले….

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे सतत चर्चेत असतात. अमली पदार्थाविरोधात कारवाई करून चर्चेत आले होते. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते. यामुळे ते चर्चेत असतात.

असे असताना आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहे. त्यांच्यावर कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर मागील वर्षी महिन्यात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. यामुळे ते आता अडचणीत आले आहेत.

त्यांच्यावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाईल. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धरतीवर ईडी ने ECIR दाखल केला आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

याबाबत शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. यामुळे हा वाद वाढतच गेला होता. दरम्यान, कॉर्डिलिया क्रूज मधील साक्षीदार के पी गोसावी आणि त्याचा साथीदार सनवेल डिसूजा यांनी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून आर्यनला मदत करण्यासाठी १८ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. यानंतर ते लाच प्रकरणात अडकले. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काही लोकांची चौकशीही केली आहे.

ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी काही एनसीबीशी संबंधित आहेत. यात खासगी लोकांचाही समावेश असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणेने या सर्वांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. यामुळे काय होणार लवकरच समजेल.