मित्राचा सल्ला सानियाने धुडकवला अन् आता आली पश्चाताप करण्याची वेळ, नेमकं काय झालं?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतलग्न केले होते. यामुळे तिच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली.

त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. याबाबत आधीच बातम्या येत होत्या. घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अनेकांनी त्याचे अभिनंदन केले तर काहींनी त्याच्यावर टीका केली.

दरम्यान, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. याचे कारण म्हणजे तिने सोहराब मिर्झासोबतची एंगेजमेंट मोडून शोएबसोबत लग्न केले होते. मात्र याबाबत तिने कोणाचे ऐकले नाही.

याबाबत सानियाचे काही मित्र आणि जवळच्या लोकांचा तिचा हा निर्णय मान्य नव्हता. मात्र तिने सर्वांच्या विरोधात जाऊन शोएबसोबत लग्न केले. मात्र आता तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. काहीच वर्षात ते वेगळे झाले आहेत.

पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफ यांनी हा खुलासा केला आहे. एका शोमध्ये बोलताना, शोएब आणि सनाच्या लग्नानंतर आपण सानिया मिर्झा सोबत फोनवरून संपर्क साधला होता, असे त्यांनी सांगितले. नईम हनीफ म्हणाले, सानिया बोलली की दुःख खूप आहे.

त्यावेळी 14 वर्षांपूर्वी जवळच्या लोकांचा सल्ला ऐकायला हवा होता. त्यावर विचार करायला हवा होता. मला शोएबसोबत लग्न करण्यापासून रोखणाऱ्या माझ्या मित्रांचे ऐकायला हवे होते. मात्र तसे काही झाले नाही. तिने लग्न केलं.

असे असताना दुसरीकडे शोएब मलिकचे कुटुंबही त्याच्या आणि सनाच्या लग्नावर खुश नाहीत. नईम हनीफ म्हणाले की, शोएबची आई, बहीण आणि मेहुणा यांपैकी कुणीही लग्नाला उपस्थित नव्हते. यामुळे त्यांना देखील हे आवडले नसल्याचे सांगितले जात आहे.

शोएबच्या कुटुंबीयांसंदर्भात सानियाला कसल्याही प्रकारची तक्रार नाही. आपल्या करियरमध्ये शोएब मलिकच्या मेहुण्याचे मोठे योगदान आहे, असेही सानियाने म्हटल्याचे त्यांनी सांगितेल. मात्र आता नदीखालून बरेच पाणी गेले आहे.