Ram mandir : महाराष्ट्रातील हा सरपंच ठरला भाग्यवान! मिळाले राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण, जाणून घ्या…

Ram mandir : सध्या अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारले जात आहे. याची जोरदार तयारी सुरू आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना महाराष्ट्रात एका गावाच्या सरपंचाला कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

यामध्ये हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. ते जाणार की नाहीत याबाबत माहिती समोर आली नसती तर त्यांना आमंत्रण मात्र आले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

दरम्यान, या मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, असे असताना मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास अनेकांनी विरोध केला आहे. यामुळे यावरून वाद निर्माण होत आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत छावणीचे स्वरूप आले आहे. याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकं याठिकाणी येणार आहेत.

महाराष्ट्रातून देखील अनेकांना निमंत्रण दिले गेले आहे. या दिवशी सरकारी सुट्टी देखील देण्याची मागणी अनेकांनी केली आहे. यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. या कार्यक्रमाची भव्यता खूपच मोठी असणार आहे.