राजकारण

सुप्रियाताईंच्या गाडीत बसले तोंड लपवून शरद पवारांना भेटले, अखेर नेत्याचे नाव आलं समोर, पक्षही सोडणार?

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. अनेक नेते सध्या पक्ष बदलत आहेत.

यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच काल मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा फाईलने लपवला होता. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत, फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी मंत्री राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामुळे आता अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काल सोशल मीडियात सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे हा नेता नेमका कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडीओ मधील स्वतःचा चेहरा फाईलने लपवणारी व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता ते कधी याबाबत निर्णय घेणार ये लवकरच समजेल.

नुकतीच शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे. सध्या हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटके यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अजून बडे नेते देखील तुतारी हातात घेणार आहेत.

Related Articles

Back to top button