Satara Ladies Horror : साताऱ्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. येथील रविवार पेठेमध्ये रात्री अचानक विद्रूप चेहरा असलेली महिला दिसल्याने एकच गोंधळ उडाला. नंतर याबाबत माहिती शहरात पसरली. या विद्रूप महिलेची चर्चा शहरभर होऊ लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळ येथे काळोख होता. यावेळी शौचालय वापरण्यासाठी गेलेल्या माहिलांना शौचालयामध्ये ही विचित्र आकृती दिसली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नंतर ही बातमी सगळीकडे पसरली. नंतर
सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. येथील नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेडात येऊन पाहणी केली.
तरुणांनी या शौचालयामध्ये प्रवेश केला. त्यांनी महिलांनी सांगितलेल्या ठिकाणी बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता खरोखरच तिथे एका महिलेची आकृती दिसली. यामुळे अनेकांना भीती वाटली. नंतर मात्र कोणीतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला पांढरी चादर गुंडाळून त्या ठिकाणी बसवल्याचे दिसून आले.
यामुळे या महिलांनी अशी जीवघेणी मस्करी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. फार हिंमत करुन या तरुणांनी काठीच्या सहाय्याने या आकृतीला हलवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा प्रकार समोर आला आहे.
सुरुवातीला हा मृतहेद आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली. मात्र नंतर सगळा प्रकार समोर आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, अंधारात अशा अवस्थेत महिलांच्या शौचलायामध्ये गुडघ्यामध्ये डोकं घालून पांढऱ्या वस्त्रातील बाई बसल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.