तरुणाचं फुगलेलं जॅकेट पाहून आला संशय, झडती घ्यायला सुरवात केली अन् चेन उघडताच उडाली खळबळ

सध्या लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन येणाऱ्या सायबेरियन पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत भयंकर माहिती समोर आली आहे.

याठिकाणी परदेशांमधून येणाऱ्या पक्ष्यांची शिकार केली जात आहे. त्यांचे मांस विकून शिकारी पैसे कमावत आहेत. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

या विडिओमध्ये एक तरुण त्याच्या जॅकेटमधून एका पाठोपाठ एक असे सात सायबेरियन पक्षी बाहेर काढत आहे. हे सगळे पक्षी मेलेले आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना महेवाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अलवारामधील आहे.

याबाबत माहिती अशी की, याठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये सायबेरियन पक्षी येतात. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली की या भागात शिकार होत आहे. पोलिसांनी या भागात अरुण कुमार नावाच्या तरुणाला पकडले आहे. त्याच्याकडून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी त्याला पकडून त्याची झाडाझडती घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना एकच धक्का बसला. अरुणच्या जॅकेटमध्ये मृत पक्ष होते. त्यानं जॅकेटमध्ये लपवलेले ७ पक्षी बाहेर काढले. एका शिकाऱ्याकडून सायबेरियन पक्षी खरेदी केल्याचे अरुणने सांगितले.

हे पक्षी १२५ रुपयांना एक असे विकले जातात. शाहपूर, महेवाघाट, मुबारकपूर, घोघपुरवासह अनेक गावातील शिकारी रात्रीच्या वेळी तळ्यातील पाण्यात औषध ठेवतात. यातून ते या पक्षांना मारतात. या पक्ष्यांची शिकार करण्यास बंदी आहे. तसा कायदा आहे. याबाबत तपास सुरू आहे.