गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर, महिलांवर झालेल्या अनेक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता अभिनेते किरण माने यांनी एका सेक्स स्कॅंडलसंदर्भात पोस्ट शेअर करून खळबळजनक दावा केला आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत तपास करावा अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, कराडनजीकच्या एका आश्रमात सेक्स स्कॅंडल सुरू असल्याचा दावा, किरण माने यांनी केला आहे. यामध्ये समाजसेविका, राजकारणी तसेच पोलीस अधिकारीही सामील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोस्ट करून त्यांनी म्हटले आहे की, कराडजवळील टेंभू गांवातल्या ‘छत्रछाया’ या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे. आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना हे करायला भाग पाडत आहेत.
अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. या सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे.
असो, आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी ‘चीप’ मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे ‘लापता’ आहेत. अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे आता याचा सखोल तपास होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, कोलकाता बलात्कार प्रकरणानं देश हादरला असताना बदलापूर इथं शाळेतल्या मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलं अन् एकच संतापाची लाट उसळली. आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.