लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.
यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी विरोध आहे. याबाबत उघडपणे त्यांनी बोलून दाखवलं आहे.
यामुळे मोहिते पाटील अजूनही शरद पवार यांच्याकडे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार सध्या माढ्यासाठी उमेदवाराच्या शोधात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. यामुळे त्यांनी याबाबत इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
दोन्ही नेत्यांची एक बैठक दिल्लीत झाली. यावेळी शिरुरचे खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते. माढा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी पवारांनी दाखवली होती. याबद्दल जानकर यांची पवारांसोबत चर्चाही झाली. पण जानकर महायुतीसोबत गेले.
यामुळे याठिकाणी उमेदवाराचा शोध सुरूच आहे. आता मोहिते पाटील माढा लढवणार नसतील, तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी पवारांना सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी अनेक घडामोडी घडतील.
त्यामुळे शरद पवार माढ्यात काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गायकवाड शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे पवार त्यांना उमेदवारी देऊ शकतात. याबाबत लवकरच निर्णय होईल.