ती जेवणात घाणेरडे रक्त मिसळायची, कारण…; अध्ययन सुमनचे कंगनावर गंभीर आरोप

2008 मध्ये ‘हाल-ए-दिल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अध्यायन सुमनकडे पुन्हा एकही हिट चित्रपट आला नाही. अध्यायनला इंडस्ट्रीत ती प्रसिद्धी मिळवता आली नाही. अध्ययन वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. अध्यायन सुमनने त्याची एक्स गर्लफ्रेंड कंगना रानौतवर जादूटोणा केल्याचा आरोप केला आहे.

2009 मध्ये आलेल्या ‘राझ – द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटात अध्यायन सुमन मुख्य अभिनेता होता आणि कंगना रानौत या चित्रपटात त्याच्या विरुद्ध भूमिका साकारली होती. याची बरीच चर्चा झाली होती.

नंतरत्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्यांचे अफेअर सुरू झाले. पुढे हे नाते फार काळ टिकले नाही. कंगना आणि अध्यायनचे एका वर्षात ब्रेकअप झाले. नंतर ते वेगळे झाले. असे असताना अध्‍ययन सुमनने अभिनेत्रीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले.

त्याने कंगनावर मारहाण आणि काळ्या जादूचे आरोप केले होते. अध्यायनने सांगितले होते की, कंगनाने ‘काळी जादू करण्यासाठी तिचे अशुद्ध रक्त जेवणात मिसळले होते. ‘कंगना एकदा मला एका विचित्र ज्योतिषाकडे घेऊन गेली, त्यांनी मला विचित्र मंत्र वाचण्यास सांगितले होते.

ती रोज रात्री माझ्या घरी पूजा करायला यायची आणि मला खोलीत बंद करून मंत्र म्हणायची. माझा यावर गोष्टींवर विश्वास नव्हता. पण नंतर हळूहळू माझ्या करिअरला उतरती कळा लागली.

कंगणाने याबाबत अनेक विचित्र गोष्टी केल्याचे त्याने सांगितले. यामुळे याची बरीच चर्चा सुरू झाली आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. कंगना अनेकदा अशा प्रकारच्या वादामुळे चर्चेत असते.