Shikhar Dhawan : ‘शिखर हिंमत ठेव, धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, नेमकं झालं काय?

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आला आहे. सध्या त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाही. तसेच पत्नी आयशा मुखर्जीच्या घटस्फोटामुळे शिखर अडचणीत आहे. यामुळे त्याच्यावर मोठे दुःख कोसळले आहे.

असे असताना आता शिखर धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली होती. यानंतर यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच त्याला आधार देण्याचे काम केले आहे. आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याने इन्टाग्रामवर शिखरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  

अक्षय कुमार पोस्ट करून म्हणाला, शिखरची ही पोस्ट पाहून माझं मन खरोखरच हादरले आहे. एक वडील म्हणून मला जाणीव आहे की, तुम्हाला तुझ्या मुलाला भेटता न येणं ही किती त्रासदायक गोष्ट आहे. तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी वाढदिवस झाला. दरवर्षी लेकासाठी काहीना काही खास करणारा बाप यावेळी एकटा होता. यामुळे त्याने एक पोस्ट लिहिली होती. शिखर म्हणाला, मी तुझी वैयक्तिक भेट घेऊन आता वर्ष झालं आहे.

त्यात मागील तीन महिन्यांपासून मला प्रत्येक ठिकाणावर ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे मी हा फोटो पोस्ट करत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे माझ्या बाळा. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी तुमच्याशी मनाने जोडला जातो.

मला माहित आहे की तू फार चांगल्या रितीने वाढत आहेस. बाबा तुझी नेहमीच आठवण काढतो, आणि तुझ्यावर फार प्रेम करतो, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर अनेकांनी वेगवेळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.