राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १६ नगरसेवक येत्या ५ जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन ५ पाच जुलै रोजी हे सगळे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे, अशी शक्यता आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जाणार आहे. अजित पवार यांचा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे आणि याच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी अजित पवार गटचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली होती.
यामध्ये बरीच चर्चा झाली होती. या भेटीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातील काही चर्चा झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.
असे असताना अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का देत आठ खासदार निवडून आणले, यामुळे शरद पवार यांच्या अनेक आमदार नगरसेवक देखील येताना दिसत आहेत.
यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार आपली जादू चालवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीही करून सत्ता आपण आणणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.