ठाकरे गटाला धक्का! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे विधानपरिषदेतून निलंबन…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सभागृहात शिवीगाळ केल्याचा आरोप काल करण्यात आला. याबाबत एक व्हिडिओ देखील व्हायरल होत होता. यांचं सभागृहात काल झालेल्या प्रकरणात निलंबन करण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला.

यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे. उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते.

कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल.