सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. माणगाव येथील तरुण वसंत भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार मारण्यात आले आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत.
याबाबत मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत प्रभाकर भगे यांना त्यांच्या पत्नीने तसेच सासू सासऱ्याने आडेली येथे बोलावून घेतले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने बोलवण्यात आले असल्याची माहिती आहे.
त्यांनी घराच्या कंपाउंड भोवती विद्युत तारेचे जाळे तयार करून त्या विद्युत तारांच्या जाळ्यांचा शाॅक देऊन ठार मारले. याबाबत पोलिसांनी मयत वसंत उर्फ सागर भगे यांची पत्नी नुतन शंकर गावडे, सासरे शंकर सखाराम गावडे व सासू पार्वती शंकर गावडे सर्व राहणार आडेली सातेरी या तिघांना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू आहे. आडेली सातेरीगाळू येथे रहाणारी नूतन शंकर गावडे हिच्याशी सागर याचे लग्न झाले.
नुतन गावडे ही घरी माणगाव तळीवाडी येथे तिच्या सासरी रहाण्यास आली, परंतु लग्नानंतर सुमारे ४ ते ५ दिवसानंतर तीने भाऊ सागर याच्याशी तु इथे रहायचे नाही, तु माझ्या सोबत माहेरी रहायचे असे सांगून भांडण केले व ती आपल्या माहेरी आडेली येथे निघून गेली. यामुळे वाद वाढत गेला. असे असताना सागर याने तिच्या हट्टापोटी तिच्यासोबत आडेली येथे रहाण्याचा निर्णय घेतला.
नंतर नूतन ही तिच्या वडिलांसोबत सासरी आली आणि तिने लग्नात दिलेल्या वस्तू, दागिने घेवून परत आपल्या माहेरी निघून गेली. याबत कामावरून आल्यावर सागर याने या प्रकाराबाबत पत्नीला विचारले असता पत्नी नूतन व तिच्या आई-वडिलांनी त्याला मारहाण केली. हे प्रकरण नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले.
मात्र नंतर काही दिवस सगळं मिटल, मात्र अचानक सागर याचा मृतदेह कंपाउंडमध्ये विद्युत तारा लागलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे विदयुत तारांचा शॉक देवून त्यांनी सागर याला ठार मारले आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे याबाबत तपास सुरू आहे.