गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याणमध्ये नुकतीच एका अल्पवयीन मुलीची हत्या झाली होती. ती घटना ताजी असतानाच आणखी एका हत्येची घटना समोर आली आहे.
कल्याण पूर्व भागात एका १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. खडेगोळवली या भागात ही घटना घडली आहे. १० ते १२ जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
समीर लोखंडे (१७) असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. १० ते १२ जणांच्या एका टोळीने याला बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी ही घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने त्याला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. याप्रकरणी त्यांनी काही संशयित तरुणांना अटक केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण भागात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने हल्ला करत तिची हत्या केली होती. ती तरुणी तिच्या आईसोबत सोसायटीच्या आवारात फिरत होती, त्यावेळी ही घटना घडली होती.
हल्ला केल्यानंतर आईने आरडाओरड केली, तेव्हा तिथे असलेल्या नागरिकांनी त्या तरुणाला पकडत पोलिसांच्या हवाली केले होते. सगळ्यांसमोर हा हल्ला झाल्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली होती. या अशा गुन्हेगारींच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.