मुलाचे अफेअर, मुलीच्या नातेवाईकांची मुलाच्या बापाला खांबाला बांधून मरेपर्यंत मारहाण, सांगलीत हादरवणारी घटना

सांगलीतील शिराळा तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, मुलीला प्रेमप्रकरणातून पळवल्याच्या रागातून मुलांच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून केलेल्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. यामध्ये आई गंभीर जखमी झाल्याची घटना धनटेक परिसरात घडली आहे.

दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय. ५५ , रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस याठिकाणी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, चौगुले यांच्या मुलाचे एका मुलीवर प्रेम होते. त्यानंतर त्या मुलाने मुलीला पळवून नेले. यानंतर मुलीला पळवून नेल्याचा राग तिच्या कुटुंबीयांना अनावर झाला. मुलीचे कुटुंब चांगलेच संतापले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांना म्हणजे दादासाहेब रामचंद्र चौगुले यांना खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.

आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे. ते दोघे कुठे आहेत ते सांगा असे म्हणत जोरदार मारहाण करण्यात आली. यानंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.