राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, आतली माहिती झाली उघड..

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सगळा घटनाक्रमच सांगून टाकला आहे. ते म्हणाले, आपल्याला त्यांच्या चिन्हावरुन मनसे उमेदवाराने  निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला.

यासाठी राज ठाकरे यांनी लगेच नकार दिला. यामुळे महायुतीत जाण्याबाबतची बोलणी पूर्ण झाली नाही. असे असताना आता याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. मनसेचा महायुतीतला प्रवेश हा कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिस्टकल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ताज लँड्समधील बोलणी फिस्कटली. यामुळे सगळी बोलणी फिस्कटली. एकनाथ शिंदे यांचा मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी, असा प्रस्ताव होता.

असे असताना इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते. यामुळे याबाबतची चर्चा पुढे गेली नाही. असे असले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की मनसेच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला नव्हता.

दरम्यान, राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन अमित शहा यांना भेटले होते. त्यांना दोन जागा देतील अशी शक्यता होती. मात्र चिन्हामुळे सगळं गणित फिस्कटलं. मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई देण्याची चर्चा झाली होती.